वेंगुल्र्याचे सुपुत्र संदेश कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

वेंगुर्ला-मधला परबवाडा येथील रहिवासी संदेश रमाकांत कुबल यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे. त्यांनी 1 एप्रिल 1991 रोजी पोलीस दलात भरती होऊन आपली सेवा सुरू केली. त्यांनी आतापर्यंत 34 वर्षांची अखंड सेवा पूर्ण केली आहे. त्यांनी आपल्या सेवेत नियंत्रण कक्ष, मालवण पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एल.सी.बी.) सिंधुदुर्ग, तसेच मोटार परिवहन विभाग सिंधुदुर्ग अशा विविध शाखांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कामात नेहमी सतर्क, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून संदेश कुबल यांची ओळख आहे. त्यांच्या बढतीबद्दल पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या सह सहकारी कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी आणि वेंगुर्ला परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu