एकपात्री अभिनय स्पर्धेत सीमा मराठे अंतिम फेरीत

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत बोरिवली येथे घेण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेमधून वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा शशांक मराठे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.     १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्य परिषदेमार्फत महाराष्ट्रभर…

0 Comments

सँड्रा फर्नाडिसला बेस्ट आऊट गोर्ईंग स्टुडंट अवॉर्ड

गूढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांच्या शोधकार्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स या केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विषयात 10 आऊट ऑफ 10 गुणवत्ता प्राप्त करीत सिंधुदुर्गातील सँड्रा शैलेस्तिन फर्नाडिस या विद्यार्थिनीने कर्नाटकातील श्रीनिवास विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सँड्राने मिळविलेल्या…

0 Comments

मिहिर कुलकर्णी याचे सीए परिक्षेत यश

वेंगुर्ला येथील ‘गुरूकृपा‘ कापड दुकानाचे मालक प्रदिप शिवराम कुलकर्णी यांचा मुलगा मिहिर प्रदिप कुलकर्णी याने पुणे येथे सी.ए.फायनल परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशात त्याला आई-वडिलांची मोलाची साथ लाभली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments

रमण किनळेकर यांना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान

वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण काशिनाथ किनळेकर यना राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी रोजी अहमदनगर येथे करण्यात आले.       महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय निवृत्त सेवा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कारामध्ये वेंगुर्ला येथील प्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक…

0 Comments

प्रा. अविनाश बापट यांच्या कादंबरीला शांता शेळके पुरस्कार

कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर-पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा शांता शेळके उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्रा.अविनाश विनायक बापट यांच्या मालवणी बोली भाषेतील ‘खलाटी वलाटी‘ या कादंबरीला नुकताच जाहीर झाला आहे. प्रा. अविनाश बापट यांनी कथा, कविता, कादंबरी ललित लेख अशा साहित्य प्रकारात मिळून २४…

0 Comments

नितेश मानवरची ट्रॅकिग कॅम्पसाठी निवड

वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील एन.सी.सी.चा विद्यार्थी नितेश परशुराम मानवर याची केरळ येथे होणा-या राष्ट्रीय ट्रॅकिग कॅम्पसाठी निवड झाली असून हा कार्यक्रम भारत येथील केरळ विभागात होणार आहे.       नितेश मानवर याला ५८ महा बटालियन, एन.सी.सी., सिधुदुर्ग व पाटकर हायस्कूलचे एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.सुशांत धुरी…

0 Comments

देवयानी आजगांवकर यांना सेवामयी शिक्षक पुरस्कार

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणतर्फे दरवर्षी दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ कै.जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार (२०२४) सावंतवाडी येथील पेंडूर-पेंढर्‍­याचीवाडी प्राथमिक शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका देवयानी आजगांवकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम ५००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून…

0 Comments

मालवणी ‘भेरा‘ चित्रपटाची निवड

पिगुळी येथील रहिवासी अभिनेते, लेखक प्रसाद खानोलकर यांच्या ‘साकव‘ या कथेवर आधारित अनिल जाधव पुरस्कृत व श्री वैजप्रभा चित्र निर्मित ‘भेरा‘ या चित्रपटाची चेन्नई येथे होणा­या २१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘इंडियन पॅनोरमा‘ विभागात निवड झाली आहे. कुडाळचे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्रीकांत भिडे यांनी…

0 Comments

वेंगुर्ल्याच्या नेहा आरोलकरची स्पेन येथे निवड

जागतिक स्तरावरील कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे व विद्यार्थी डिजिटल शेती तंत्रज्ञानामध्येही कुशल व्हावेत या उद्देशाने जागतिक बँक आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देशातील विद्यार्थ्यांना कृषी विषयक उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविण्यात येते. यावर्षी कृषी तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या स्पेन या देशामध्ये डिजिटल कृषी…

0 Comments

प्रा.देऊलकर यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विलास देऊलकर यांना भारत सरकार पुरस्कृत संस्था नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी, बेळगावी यांच्याकडून दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून गुणवत्तेवर आधारित निवडक प्राचार्यांना देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे.…

0 Comments
Close Menu