माझा बाप्पा
सकाळी सकाळीच भूपाळीचे मधूर सुर कानी पडतोय. अगरबत्तीचा दरवळ अवघं घर व्यापून पसरलाय. घरात लगबगीनं कामं चाललीत. ओटा आणि देवघर शेणानं सारवून झालंय. त्याचा निराळाच गंध घरभर पसरलाय. देवघरातून येत असणारा समईचा मंद प्रकाश देवत्त्वाची चाहूल देवून जातोय. मग मध्येच वाटतंय, की पांघरुण…
