वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावची मुकबधिर कन्या पूजा रुपाजी धुरी हिने जी डी आर्ट (पेंटींग) या विभागातून प्रथम श्रेणी (६५ टक्के) मिळवून मुकबधिर विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. कु. पूजा हिला ऐकता व बोलताही येत नाही. असे असतानाही तिने सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात नॉर्मल मुलांच्यामधून पाच वर्षे कलेचे उच्च शिक्षण घेऊन हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       सदरचे शिक्षण घेण्यासाठी कर्णबधिर शाळेचे अपंग कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांनी तिला सांगली कलाविश्व महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तसेच शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी माजी मंत्री व आमदार दीपकभाई केसरकर यांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच तिला पाच वर्षे उत्तम असे कलेचे शिक्षण घेणे शक्य झाले. विशेष म्हणजे कु. पूजा हिचे आई वडीलही मुकबधिरच आहेत.

Leave a Reply

Close Menu