रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा हा ७०टक्के ग्रामीण क्षेत्र आहे. तालुका हायस्कूल, माध्यमिक हायस्कूलमध्ये आठवी-दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. शाळेतील २५ ते ३०टक्के विद्यार्थी बसने येत असतात. ग्रामीण भाग त्यात ठरावीक बस असल्याने वेळेच्या आधी व शाळा सुटल्यावर उशिरा घरी जावे लागते. त्यांची ही परवड थांबण्यासाठी मानव साधन विकास संस्था अंतर्गत ‘‘परिवर्तन केंद्र‘‘ नियोजित जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, गोवा व पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल बँक अंतर्गत २५० शाळांना २ हजार सायकल सुपुर्त करण्यात आल्या आहेत. यासाठी मानव साधन विकास संस्थानच्या अध्यक्षा उमा सुरेश प्रभु यांनी पुढाकार घेतला. इयत्ता आठवी ते दहावीमधील ज्या मुली शाळेला ३ ते ४ किमी वरुन येतात त्यांना या सायकली देण्यात आल्या आहेत.

       आठवी ते दहावीच्या मुलींमध्ये शारीरिक परिवर्तन होत असते. सायकल चालवल्याने व्यायाम होतो. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य मिळते, म्हणून सायकलीसाठी मुलींना प्राधान्य देण्यात आले. चांगली सायकल व्यवस्थित वापरली तर १५ ते २० वर्ष चालते. मुली दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी शहरात येतात मग सायकल अडगळीत पडते तसे न होता परत सायकल वापरात येण्यासाठी आणि तिचा दुस-या गरजू मुलीला उपयोग होण्यासाठी सदरची सायकल शाळेकडे परत जमा करण्यामागचा उद्देश आहे.

       सुरेश प्रभू यांनी २५० शाळांमध्ये दहा सायकली शाळेच्या बँकेत फिक्स डिपॉझिट केल्या आहेत. तसेच २५० ई सायकल (बॅटरीवर चालणारी) ५०० सायकल गरजू महिलांना मुंजाळ फाऊंडेशनकडून उपलब्ध करुन दिल्या आहेत. शुन्य टक्के मेन्टेनस् यावा, दणकट, सायकलची निवड उमा सुरेश प्रभू यांनी केली आहे. दिलेले दान गरजू पर्यंतच पोहचले पाहिजे या कटाक्षानेच प्रत्यक्ष जनशिक्षणसंस्थेमार्फत सर्वे करुन मुलींची खात्री करुनच परिवर्तन केद्रांमार्फत सायकल सुपुर्त करण्यात आल्या आहेत. आपणही आपल्याकडील वापरात नसलेली सुस्थितीतील सायकल तसेच वाढदिवस, सेवानिवृत्त होताना भेट म्हणून शाळेत सायकल देऊ शकता. सायकल बँक उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास प्रकल्प अधिकारी विलास हडकर (९४२११४६०६२) यांच्याशी संफ साधावा.

Leave a Reply

Close Menu