वेंगुर्ला तालुक्याला काल शनिवारी रात्रीपासून ताऊकतीचक्रीवादळाचा तडाखा बसला असून वादळी वा-यासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे, विद्युत खांब पडून मार्ग ठप्प झाले. तर वादळी वा-याने कौले तसेच पत्रे उडून गेल्याने काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणीही जाण्याचे प्रकार घडले. दरम्यान, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झालेली पहायला मिळत आहे.

      चक्रीवादळाच्या सर्तकतेच्या इशा-यानंतर वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी रात्रीपासून ताऊकतीवादळाचा परिणाम दिसून आला आहे. तालुक्यामध्ये ब-याच प्रमाणात झाडे आणि विद्युत खांब पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला. दुपारपर्यंत वा-याच वेग जास्तच होता. या वाढत्या वा-यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Close Menu