विद्यापिठाच्या संशोधनाबाबत कुलगुरुंकडून प्रशंसा

महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची कुलगुरू समन्वय समितीची सभा वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र पार पडली. यावेळी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी.सावंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ए.एस.ढवण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ.पी.जी.पाटील उपस्थित होते. या सर्वांनी केंद्राचे संशोधनात्मक कार्य व प्रक्षेत्र व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

       सभेच्या प्रारंभी डॉ.एस.डी.सावंत यांना कर्नल कमांडरहे आर्मीतील विभागातून पद देण्यात आल्यामुळे कुलगुरू यांचा सत्कार कुलगुरू समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.व्ही.एम. भाले यांच्या हस्ते करण्यात आला. सभेत विविध विषयाची चर्चा झाल्यानंतर सर्व कुलगुरूंची प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट आयोजित करण्यात आली. सर्वप्रथम येथील चार प्रयोगशाळेला भेट देऊन फळ प्रक्रिया प्रयोगशाळेत तयार केले जाणारे विविध प्रक्रिया युक्त पदार्थांची पाहणी सर्व उपस्थित कुलगुरूंनी केली. येथील उत्पादित प्रक्रियायुक्त पदार्थाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर रोपवाटिका विभागाला त्यांनी भेट देवून कलमांची पाहणी केली. दुपारच्या सत्रात आंबा प्रक्षेत्राला भेट देऊन तेथे लुपिन फाऊंडेशन व विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या सुरंगीच्या कलमांची बांधणी पद्धतीबाबत उपस्थितांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. सध्या बदलत्या हवामानात आंबा पिकांमध्ये अति पर्जन्यमानामध्ये चांगली येणारी फळ पिके ड्युरीयन, रानबुतान, लोगान, मँगोस्टीन इत्यादी फळ पिकांची पाहणी करून विद्यापीठाने चालू केलेल्या या संशोधनाबाबत त्यांनी विद्यापीठाच्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर येथील कृषि पर्यटन अभ्यासक्रमाला भेटदेवून या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत, किटकशास्त्रज्ञ डॉ.व्ही.एस.देसाई, उद्यानविद्यावेत्ता (आंबा)डॉ.एम.एस.गवाणकर, चार प्रयोगशाळा प्रमुख डॉ.एम.बी.कदम, किटकशास्त्रज्ञ डॉ.ए. वाय.मुंज, उद्यानविद्यावेत्ता डॉ.एम.पी.सणसमृदशास्त्रज्ञ डॉ.एस.व्ही.देशमुख, काजू पैदासकार एल.एस.खापरे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu