प्रासंगिक

संपादकीय लेख

ताज्या बातम्या

अभिनंदन

उपक्रम

आमची प्रकाशने

किरात साप्ताहिकाची वाटचाल

किरात साप्ताहिकाची वाटचाल

एकेकाळी भरभराटीचे बंदर असलेल्या पश्चिम किना-यावरील वेंगुर्ले या शहरातून ‘किरात‘ हे साप्ताहिक वृत्तपत्र सन १९२२-२३ यावर्षीपासून सुरु झाले. अनंत वासुदेव मराठे हे या वृत्तपत्राचे संस्थापक आणि पहिले संपादक होते. वेंगुर्ले शहर ऐतिहासिक काळापासून व्यापारी उतार पेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्याच्यावर इंग्रजांचा अंमल होता. स्वाभाविकच इंग्रज राज्यकर्त्यांना आवश्यक असणा-या सुधारणा या वेंगुर्ले शहरात झालेल्या होत्या. शिक्षणाचा प्रसार ब­-यापैकी होता. अनेक व्यापारी पेढ्या या शहरात होत्या. देशातल्या कोचिन-मुंबई-कराची या प्रमुख बंदराकडे तसेच परदेशातही वेंगुर्ले बंदरातून व्यापारी मालाची वाहतुक होत असे. विशेषतः या …
आणखी वाचा

किरातचा नेमका अर्थ

साप्ताहिक किरात मधील ‘किरातचा’ नेमका अर्थ –
 संस्कृत मध्ये किरातचा ‘भिल्ल’ असा अर्थ आहे.’किरात’ हे भगवान शंकरचेही नाव आहे.फार पूर्वीपासून भिल्ल,आदिवासी , कातकरी असे विविध समुदाय कोकण पट्ट्यात वास्तव्याला होते आणि आहेत. शिकार करणे हे त्यांच्या चरितार्थाचे साधन होते. आणि ती शिकार बाणानेच होत असे. त्या समुदायाच्या अंगी असलेले मूलभूत कौशल्य म्हणजे ‘अचूक लक्ष्यवेध’ म्हणून साप्ताहिक किरातच्या सुरुवातीच्या काही वर्षातील अंकांमध्ये बाणाच्या लोगो सोबत भिल्लाचेही चित्र दिसते.विविध सामाजिक ,राजकीय घटनांबाबत लेखणीने अचूक शरसंधान हे साप्ताहिक किरातचे वैशिष्ट्य राहिले आहे. या जाणिवेतून साप्ताहिकाचे नामकरण ‘किरात’ असे करण्यात आले. आजही चाकरमान्यांना गावच्या घडामोडी देत असताना कोकणातील विविध सामाजिक राजकीय प्रश्न मांडले जातात.
Close Menu