►राऊळ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

पिगुळी येथील प.पू.सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ३९वा पुण्यतिथी महोत्सव २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे २९ ते ३१ जानेवारीपर्यंत २१ ब्राह्मणांच्या हस्ते शतचंडी याग आयोजित केला आहे. 

      सोमवार दि. २९ रोजी पहाटे काकड आरती, ७ वा. धार्मिक विधी., १२.३० वा. महाआरती, १ ते ३ महाप्रसाद, ३ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ६.३० नित्य सांजआरती, ७.३० वा. हवा नवा तो सूरहा सुनिल पाडगांवकर (मळगांव) यांचा भक्ती संगीत कार्यक्रम, रात्रौ ९ वा. ह.भ.प.मुंडले यांचे कीर्तन, मंगळवार दि. ३० रोजी पहाटे काकड आरती, ७ वा. धार्मिक विधी, १० वा. प.पू.विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिगुळी यांच्यामार्फत व रोटरी लोककल्याण मंडळ, कोल्हापूर रूग्णोपयोगी साहित्य वितरण केंद्र कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम जयपूर फूट मोजमाप शिबिर, १२.३० वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद व झाराप येथील संदेश सामंत यांचे गायन, ३ वा. श्री नामदेव महाराज भक्त मंडळाचे नामस्मरण, सायं. ५ वा. प.पू.स.स.राऊळ महाराज सप्तसूर महिला भजन मंडळ यांचे भजन, दि. ३१ रोजी पहाटे काकड आरती, ६ वा. राऊळ महाराज समाधी मंदिरात अभिषेक व सार्वजनिक गा-हाणे, ७ वा. धार्मिक विधी, १० वा. मोफत हाडांची तपासणी, मोफत मधुमेह तपासणी, १०.३० वा. बाबू गडेकर यांच्या दामोदर बोग्देश्वर, गोवा आकर्षक दिडी पथकाचे आगमन, नामस्मरण आणि अण्णा महाराज समाधी मंदिरात पादुकापूजन, १२.१० वा. भाविकांच्या उपस्थितीत राऊळ महाराज संस्थान नामकरण विधी, १२.३० वा. महाआरती, दु. १ वा. समर्थ राऊळ महाराज भक्त मंडळ, आजरा पंचक्रोशी यांच्या दिडीचे आगमन, दु. १ ते रात्रौ ११ पर्यंत अखंड महाप्रसाद, १ वा. बाबू गडेकर यांच्या दामोदर बोग्देश्वर, गोवा यांचे दिडीसह वारकरी भजन, दु. ३ वा. दत्त संगीत मंडळ बच्च सावर्डे, कोल्हापूर यांचे भजन, ४ वा. राऊळ महाराज भक्त मंडळ आजरा यांचे भजन, ५.३० वा. राऊळ महाराज भक्त मंडळ मुंबई यांचे भजन६.३० वा. सांजआरती व राऊळ महाराज समाधी स्थान ते जन्मस्थानापर्यंत पालखी मिरवणूक, रात्रौ ८ वा. ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ शिरोडा यांचे भजन, ९ वा. पावणाई लिगेश्वर प्रासादिक मंडळ कुसगांव यांचे भजन, रात्रौ १० वा. कै.सुधीर कलिगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा वेंकटेश पद्मावतीहा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.

      यावेळी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, पिगुळी व विश्वस्त मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Close Menu