वेंगुर्ल्यात गुरुवारी नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरीकांबरोबरच येथील पोलिस स्टेशन, पत्रकार समिती, लोकप्रतिनिधी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. दरम्यान, तालुका पत्रकार समितीच्यावतीने अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी नारळाची विधीवत पूजा करुन समुद्राला अर्पण केला.
यावेळी पत्रकार समितीचे उपाध्यक्ष के.जी.गावडे, सचिव अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष दाजी नाईक, सदस्य दिपेश परब, तालुका पत्रकार समितीचे सदस्य भरत सातोस्कर, प्रथमेश गुरव, विनायक वारंग, अजय गडेकर आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंदर येथे नारळी पौर्णिमा साजरी केली.