वेंगुर्ला येथील एका सोन्याच्या दुकानातून ३ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फक्त १० हजार रुपये देऊन फसवणूक करणा-या सांगली येथील रणधीर भोसले याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रशांत सदाशिव मालवणकर यांच्या सोन्याच्या दुकानातून आरोपी रणधीर राजेंद्र भोसले (सांगली) सांगली याने एकूण ३ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून त्या बदल्यात मालवणकर यांना फक्त १० हजार रुपये व त्यांच्या बँक खात्यावर फक्त एक रुपया ट्रान्सफर करून मालवणकर यांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपी हा फरार होता. याबाबत मालवणकर यांनी वेंगुर्ला पोलिसात तक्रार दिली होती.
गुन्ह्यातील आरोपी हा हुकेरी पोलीस ठाणे येथे मिळून आल्याने आरोपीला १२ ऑगस्ट रोजी बेळगाव येथून वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून त्याने फसवणूक करून घेतलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.