खिलाडीवृत्तीने विद्यार्थी शाळेचे नाव उज्ज्वल करतील-मोहन भोई

जि.प. सिधुदुर्ग व पं.स.वेंगुर्ला तर्फे २९ व ३० डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव संपन्न झाला. याचे उद्घाटन सिद्धिविनायक मंगल कार्यालयात गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, शिक्षक समितीचे नितीन कदम, प्रमोद गावडे, महादेव आव्हाड, प्रियदर्शनी कावळे, सिताराम लांबरत्रिबक आजगांवकर, एकनाथ जानकर, शंकर वजराटकर, झिलू घाडी उपस्थित होते. शासनाच्या या अशाप्रकारच्या महोत्सवांमुळे मुलांचा बौद्धिक विकास वाढण्यास मदत होणार असल्याचे मोहन भोई यांनी तर या उपक्रमामुळे कोरोना काळात खुंटलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासात वाढ होऊन ते पुन्हा उत्तुंग भरारी घेतील असे प्रतिपादन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले. सूत्रसंचालन लवू चव्हाण व ऋतिका राऊळ तर सुनिता भाकरे यांनी आभार मानले.

                        स्पर्धेमधील प्रत्येक गटातील अनुक्रमे प्रथम दोन क्रमांक-लहानगट-१ली ते ५वी-५० मी. धावणे-मुलगे-ओंकार चव्हाण (परुळे नं.३), पार्थ चव्हाण (म्हापण नं.१), मुली-वैष्णवी नाईक (वेतोरे नं.१), वैधवी परब (तुळस-गिरोबा), १०० मी. धावणे-मुलगे-नारायण नाईक (केरवाडा), साबाजी पडवेकर (वजराट नं.१), मुली-अवनी हरमलकर (वेतोरे नं.१), अवनी बटा (केरवाडा), ५० बाय ४ रिले-मुलगे-वेतोरे नं.१, वजराट नं.१, मुली-वेतोरे नं.१, शिरोडा नं.१, उंचउडी-मुलगे-धनंजय केरकर (उभादांडा नं.१), ओंकार चव्हाण (परुळे नं.३), मुली-मानसी परब (मठ नं.२), निधी रावले (कोचरे मायने), लांबउडी-विष्णू नाईक (पेंडुर-नाईकवाडा), निलेश भोने (उभादांडा नं.१), मुली-मान्यता पेडणेकर (वेंगुर्ला नं.३), दिशा धर्णे (आडेली नं.१), कबड्डी-मुलगे-तुळस, वेंगुर्ला, मुली-म्हापण, वेंगुर्ला, खो-खो-मुलगे-म्हापण, तुळस, मुली-तुळस, म्हापण, ज्ञानी मी होणार-वजराट पिपळाचे भरड, वेंगुर्ला नं.३, समुहगान-तुळस-वेताळ, वेंगुर्ला, समुहनृत्य-वेंगुर्ला, तुळस,

      मोठा गट-६वी ते ८वी-१०० मी.धावणे-मुलगे-चिन्मय मडवळ (परुळे नं.३), संतोष नाईक (तुळस-जैतिर), मुली-प्रांजल हुले (दाभोस), इंदुजा पेडणेकर (उभादांडा नं.३), २०० मी. धावणे-मुलगे-महादेव राऊळ (आसोली), शांताराम हुले (परुळे-कुशेवाडा), मुली-प्रांजल हुले (दाभोस), तन्मयी पावणोजी (होडावडे नं.१), १०० बाय ४ रिले-मुलगे-परुळे नं.३, भोगवे नं.१, वेंगुर्ला नं.४, मुली-होडावडे नं.१, उभादांडा नं.३, उंचउडी-मुलगे-वासुदेव तुळसकर (तुळस जैतिर), योगांत होडावडेकर (मठ नं.२), मुली-प्राप्ती डिचोलकर (केपादेवी), मानसी परब (वजराट नं.१), लांबउडी-मुलगे-यश आरोलकर (प्रताप पंडित), पार्थ म्हापणकर (आडेली खुटवळ), मुली-प्राप्ती डिचोलकर (केपादेवी), श्रेया मुंडये (परुळे-शेळपी), गोळा फेक-मांगल्य मेतर (प्रताप पंडित), पार्थ म्हापणकर (आडेली-खुटवळ), मुली-पूर्वा ताम्हणकर (म्हापण-खवणे), कोमल परब (मठ-कणकेवाडी), कबड्डी-मुलगे-म्हापण, तुळस, मुली-वेंगुर्ला, तुळस, खो-खो-मुलगे-म्हापण, तुळस, मुली-म्हापण, तुळस, ज्ञानी मी होणार-परबवाडा शाळा, वजराट नं.१, समुहगान-तुळस, म्हापण, समुहनृत्य- तुळस, वेंगुर्ला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सहा शाळा जिल्हास्तरावर- या महोत्सवात सहभागी झालेल्या १८ शाळांपैकी ६ शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यात ज्ञानी मी होणारलहान गट-पिंपळाचे भरड, मोठा गट-परबवाडा नं.१, समुहगीतमध्ये लहान गट -तुळस वेताळ, मोठा गट-वजराट नं.१ तर समुहनृत्य स्पर्धेत लहान गट वेंगुर्ला नं.४, मोठा गट-आडेली नं.१ यांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Close Menu