वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत शालेय मुली-मुलगे, व खुल्या पुरुष व महिला अशा एकूण १२ गटात घेतलेल्या ‘जंगल वाचवा पाणी वाचवा‘ दौड स्पर्धेस जिल्ह्यातील सुमारे ३८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन माजी सभापती यशवंत परब यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रंजीता चौहान, मंगेश राऊळ, विजयानंद सावंत, पोलीस दीपा धुरी, रुपाली वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक संजय परब, शिक्षक तेजस बांदिवडेकर, विवेक तिरोडकर, प्रा.एम.बी.चौगले, प्रा.बी.एम.भैरट, संजय पाटील आदी उपस्थित होते. पोलीस रंजीता चौहान यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. स्पर्धेचा गटनिहाय निकाल-प्रथम तीन-खुला गट (पुरुष)- शिवम घोगळे (वेंगुर्ला), विराज भुते (कुर्लेवाडी-मूठ), सिद्धेश हरमलकर (न्हावेली), महिला- हेमलता राऊळ (वेंगुर्ला), श्वेता परब (तुळस), मुसरत जद्दी (नेमळे), पहिली-दुसरी (मुलगे)-मदन परब (गिरोबा विद्या.तुळस), मेहुल राऊळ (जैतीर विद्या.तुळस), विहान धुरी (वेंगुर्ला नं.१), मुली- सान्वी राजपूत (वेंगुर्ला नं.१), भक्ती परब (वजराठ नं.१), श्रुतिका खरात (गोवर्धन विद्यामंदिर वडखोल), तिसरी-चौथी-मुलगे- एकांश तुळसकर (वजराठ नं.१), स्वराज्य कांदे (वजराठ नं.१),सर्वेश भगत (श्री गोवर्धन विद्या.वडखोल), मुली-युक्ता राणे (वजराठ नं.१), वैष्णवी राणे (श्री गोवर्धन विद्या.वडखोल), वैदेही परब (गिरोबा विद्या. तुळस), पाचवी-सहावी-मुलगे-गुरुनाथ मांजरेकर (जनता विद्या.तळवडे), अथर्व राणे, यश गावडे (दोन्ही वजराठ नं.१), मुली-शमिका चिपकर (कुडाळ हाय.,), निवेदिता राणे (इंग्लिश मि.स्कुल तळवडे), भाग्यश्री बाईत (मळगाव इंग्लिश हाय.), सातवी-आठवी-मुलगे-यश राणे (आडेली हाय., चैतन्य राणे, चिन्मय राणे (दोन्ही वजराठ नं.१),मुली- आर्या कापडी (नेमळे हाय.), पूजा सावंत, मैथली कामत (दोन्ही जनता विद्या.तळवडे), नववी-दहावी-मुलगे-पारस जाधव (नेमळे हाय.), आदित्य सुतार (माध्य.विद्या. पांग्रड), रामचंद्र कोळेकर (नेमळे हाय.), मुली- वैष्णवी राणे (आडेली हाय.), निधी धुरी (नेमळे हाय.), ज्ञानेश्वरी ठुंबरे (श्री शिवाजी हाय.,तुळस).विजेत्यांना ८ जानेवारी रोजी गौरविण्यात येईल.