वेताळ प्रतिष्ठानतर्फे अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने तुळस येथे घेतलेल्या शालेय व खुल्या पुरुष रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई परब, संतोष परब, निलेश नागवेकर, पोलीस उपनिरीक्षक रंजिता चौहान, उपसरपंच सचिन नाईक, ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर व नारायण कुंभार, जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव किशोर सोनसुरकर, विवेक तिरोडकर, सचिन परुळकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर, नाना राऊळ, प्रकाश परब, सुजाता पडवळ, मधुकर परब, सुधीर चुडजी, महेश राऊळ, मंगेश सावंत, सद्गुरु सावंत, प्रसाद भणगे, हेमंत गावडे आदी उपस्थित होते.
दोन्ही गटत जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात सिद्धेश्वर दाळकर संघ, तळवडे यांनी स्टार किग निरवडे संघास पराभूत करत विजेतेपद पटकाविले, तर शालेय गटात जनता विद्यालय तळवडेला नमवित न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाने बाजी मारत विजेत्या पदाचे मानकरी ठरले. बेस्ट फ्रंटमन सतीश नाईक (स्टार निरवडे) व बेस्ट लास्टमन दादा परब (सिद्धेश्वर दाळकर) यांनी बहुमान मिळविला. विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीते –साठी सामाजिक कार्यकर्ते विकास घारे व माजी मुंबई नगरसेवक दादा नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले.