सरपंच, उपसरपंचांसह १२० सदस्यांचा सत्कार

  लोकसभा प्रवास योजना अभियान टप्पा २ वेंगुर्ला तालुकास्तरीय बैठक व भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार समारंभ साई मंगल कार्यालयात २ जानेवारी रोजी पार पडला. याप्रसंगी लोकसभा प्रवास योजना अभियानाचे संघटक अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा संघटक प्रभाकर सावंत, निलेश सामंत, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरपंच, उपसरपंच यांच्यासह १२० सदस्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्रित मिळून काम केल्याने वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १३ सरपंच व १६ उपसरपंचपदी भाजपने यश मिळविले. सुदैवाने आपल्याच पक्षाचे पालकमंत्री आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे भाजपाचे सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.

Leave a Reply

Close Menu