अलिकडेच वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक होऊन नूतन संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी व व्हाईस चेअरमनपदी प्रज्ञा परब यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निबंधक उर्मिला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह संघाच्या सर्व संचालक व कर्मचारी यांनी ज्ञानेश्वर केळजी व प्रज्ञा परब यांचे अभिनंदन केले.
