जिल्हा समन्वयकपदी वालावलकर तर शहरप्रमुखपदी येरम

        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी सचिन वालावलकर तर वेंगुर्ला शहरप्रमुखपदी उमेश येरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची लेखी पत्रे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री.वालावलकर व श्री.येरम यांना सुपूर्द केली. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, राजू परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याच कार्यक्रमात संतोष परब, हेमंत नाईक, विशाल रेडकर, संदेश रेडकर, वैभव मोर्जे, दिपक बागवे, दत्तात्रय राणे यांनी पक्ष प्रवेश केला.

     आपल्या शहराचा विकास हा फक्त पर्यटनाच्या माध्यमातूनच होऊ शकतो आणि त्या प्रकारचे नियोजन मंत्री दीपक केसरकर यंाच्या संकल्पनेतून चालू झालेले आहे. झुलत्या पुलापासून बंदरापर्यंत सायकल ट्रॅक व ऑकिग ट्रॅक आणि दुकानगाळे होणार आहेत. वॉटर स्पोर्टससाठी १८ कोटींचा निधी  दिला आहे. पाणबुडीसारखे प्रकल्प आणण्यासाठी मंत्री केसरकर यांचे प्रयत्न सुरू असून वेंगुर्ला शहर हे पर्यटनदृष्ट्या एक वेगळे शहर निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आपण त्यांना पूर्ण क्षमतेने सहकार्य करूया असे आवाहन उमेश येरम यांनी केले.

Leave a Reply

Close Menu