सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकारांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला. तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता संघ ठरला. या संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत वेंगुर्ला संघाचा खेळाडू हर्षल परब याने स्पर्धेच्या मालिकावीर तसेच अंतिम सामन्याचा सामनीवर चषकावर आपले नाव कोरले.
उद्घाटन भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते तर बक्षिस वितरण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, इडमिशन संस्थेचे अधिकारी संदीप नाटलेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान भाजप नेते तथा हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवा उद्योजक विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या.