गाबीत संस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप गिरप

  गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची महत्त्वाची बैठक गाबित समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर यांचे अध्यक्षतेखाली मांडवी येथील नेचर होम स्टे येथे 5 फेब्रुवारी रोजी पार पडली. य बैठकीत गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची नुतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यांत आली. यात अध्यक्षपदी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपाध्यक्षपदी भगवान मसुरकर, सचिव पदावर किरण कुबल,  सहसचिवपदी नागेश गांवकर, खजिनदारपदी जयंत मोंडकर, महिला प्रतिनिधी श्वेता हुले, ईशा मोंडकर, सदस्यपदी बाबी रेडकर, अनंत केळुस्कर, सगुण सातोस्कर, विकास आरोंदेकर यांचा समावेश आहे.

      यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, मुंबई आणि जिल्हा संघटनेच्या कामकाजाबाबत सर्वंकष माहिती दिली. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील विशेषत: किनारपट्टी भागातील सर्व गावांतील गाबीत समाज बांधवांना एकत्रित आणून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील मच्छिमारी वसाहतीतील प्रमुख प्रतिनिधींची नियोजन बैठक येत्या 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मांडवी नेचर होम स्टे येथे घेण्याचे निश्‍चित करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय गाबित समाज संघटनेतर्फे येत्या एप्रिल महिन्यात गाबित समाजाचा भव्य महोत्सव मालवण-दांडी येथे भरविण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये वेंगुर्ला येथून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रशेखर उपरकर यांनी येथे केले आहे.

Leave a Reply

Close Menu