जयप्रकाश चमणकर यांचा वाढदिवस संपन्न

 वेंगुर्ला येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पं.स.चे माजी सभापती, वेळागर आंदोलनातील प्रमुख नेते आणि वेंगुर्ला तालुका आंबा-काजू बागायतदार, शास्त्रज्ञ विचार मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी तसेच वेंगुर्ला तालुका आंबा-काजू बागायतदार, शास्त्रज्ञ विचार मंचतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

      वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाला  दिव्या वायंगणकर, प्रकाश बोवलेकर, विरेंद्र कामत आडारकर, किशोर नरसुले, रत्नदीप धुरी, दादा आरोलकर, स्वप्निल शिरोडकर, भूषण नाबर, भिकाजी चिचकर, सदाशिव आळवे, बळीराम तेंडलकर, महादेव गावडे, जगन्नाथ सावंत, गजानन वेर्णेकर, महेश चव्हाण, श्यामसुंदर राय, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर, कीटकशास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार देसाई, डॉ.मोहन देसाई, डॉ.जे.वाय.पाटील आदी उपस्थित होते. चमणकर हे गेली ४५ वर्षे आंबा, काजू समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याने त्यांचेबाबत आंबा, काजू बागायतदारांसह शेतक­यांमध्येही आदर आहे. अशा या अजातशत्रू व्यक्तिमत्वाची सर्वानुमते जिल्हा आंबा काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून यापुढच्या काळात संघटना प्रभावीपणे काम करेल असा विश्वास उपस्थित बागायतदारांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Close Menu