बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व जिमखाना डे असा संयुक्तिक कार्यक्रम प्रमुख पाहुणे सुरज साळगांवकर, राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर, बी.के.सी.असोसिएशनचे सतिश डुबळे, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.दिलीप शितोळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासावी. त्यामुळे शरीरही तंदुरुस्त रहाते असा संदेश अशोक दाभोलकर यांनी दिला. महाविद्यालय जीवनात परिश्रम केल्यास पुढील आयुष्य सुखाचे जाईल असे सुरज साळगांवकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सतिश डुबळे यांनी केले.
गेल्या शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या चैतन्या लाड, रुपाली दाभोलकर, योजना नवार, वैष्णवी चुडनाईक,मंजिरी नार्वेकर, पल्लवी कुर्ले, कोमल कुडपकर, प्रगती गावडे, सानिका करंगुटकर, सानिका मांजरेकर, विद्वत्ता वारंग, दिक्षा तोंडवळकर, फाल्गुनी नार्वेकर, विद्यापिठस्तर क्रिकेट स्पर्धेत विशेष यश प्राप्त पीटर फर्नांडीस यांचा गौरव करण्यात आला. पीटर फर्नांडीस याला विधाता सावंत व सुरेंद्र खामकर यांनी प्रत्येकी १००१ चे बक्षिस दिले. बाळकृष्ण परब, सुंदर पालव, तन्वी दळवी, प्रतिक पालव, सुनिल काळे, ओंकार गोसावी, दर्शन गडेकर, प्रतिक पालव, अमोल सावंत, मारिया आल्मेडा, शामिन फर्नांडीस, रिद्धी साळगांवकर, गौरी नाईक, यासिर मकानदार, गुरू गौरव पुरस्कार प्राप्त विणा दिक्षित, विद्यापिठाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त संजय पाटील, नॅक समन्वयक प्रा.डी.बी.राणे, सहाय्यक प्रा.बी.एम.भैरट, प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.हेमंत गावडे यांचाही सत्कार करण्यात आला. शि.प्र.मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई आदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी, पारितोषिकांचे वाचन वेदिका सावंत, क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.एल.बी.नैताम यांनी तर आभार प्रा.एस.एच.माने यनी मानले.