महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

सखीमंच वेंगुर्ल्याच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन ज्येष्ठ महिला निला यरनाळकर, सुनंदा सामंत, प्रभाताई साळगांवकर, सुहासिनी अंधारी यांच्या हस्ते झाले. चित्रा प्रभूखानोलकर यांनी गणेशवंदना सादर केली. चैत्र रामनवमी गटातर्फे रामरक्षा पठण झाले. साक्षी पेडणेकर, प्रार्थना हळदणकर, पुनम बोवलेकर, मयुरी केरकर, गौतमी भोगटे यांनी सोलो डान्स तर रामघाट, झुंबा ग्रुप, भाजप महिला, इनरव्हील, हर्षद गवंडे ग्रुप, सई लिगवत ग्रुप, युगंधरा स्वयंसहाय्यता गट यांनी विविध ग्रुपडान्स सादर केले. सीमा नाईक, विशाखा पवार, तृप्ती पवार यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. निलम कामत यांनी कोळीनृत्य सादर केले. फनीगेम्स व लकी ड्राॅसाठी तृप्ती आरोसकर व प्रिया सावंत यांचे सहकार्य लाभले. राधिका सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले. तर स्नेहा कुबल यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu