गुढीपाडव्याचे औचित्य साधून हिदु धर्माभिमानी मंडळींनी रामेश्वर मंदिरात तीन गटांमध्ये घेतलेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये एकूण ९८ स्पर्धक सहभागी झाले होते. बालवाडी ते पहिली गटामध्ये अत्रेया आचार्य (प्रथम), उर्मी परब (द्वितीय), आराध्या राऊळ (तृतीय), हेरंब राऊळ व रघुवीर काणेकर (उत्तेजनार्थ), दुसरी ते चौथी गटामध्ये प्रांजल नार्वेकर (प्रथम), देवेश नवार (द्वितीय), शुभ्रा अंधारी (तृतीय), सानवी परब व दिव्या मालवणकर (उत्तेजनार्थ), पाचवी ते दहावी गटामध्ये मुग्धा गावडे (प्रथम), वरदा परब (द्वितीय), जयेश सोनुर्लेकर (तृतीय), निरज पवार व आर्या जुवलेकर (उत्तेजनार्थ) यांनी यश प्राप्त केले.
स्पर्धेचे परिक्षण बालवाडी ते पहिली गटासाठी संजय पाटील, सचिन परुळकर व आत्माराम बागलकर यांनी, दुसरी ते चौथी गटासाठी रमेश नार्वेकर, महेश बोवलेकर व बाबुराव खवणेकर यांनी तर पाचवी ते दहावी गटासाठी अॅड. सुषमा खानोलकर, स्मिता मांजरेकर व मृण्मयी केरकर यांनी केले. तसेच बालवाडी ते पहिली गटासाठी विनय गरगटे (यश बँगल्स वेंगुर्ला), दुसरी ते चौथी आणि पाचवी ते दहावी या गटासाठी मिलिद पिजाणी (महेंद्र वस्त्र भांडार वेंगुर्ला) यांनी रोख बक्षिसे पुरस्कृत केली होती.
बक्षिस वितरण प्रसंगी संयोजन समितीचे प्रमुख प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा खानोलकर, रामेश्वर देवस्थानचे विश्वस्त रवी परब, दाजी परब, संजय पाटील, अजित राऊळ व अरुण गोगटे उपस्थित होते.