गुरु अभिवादन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी घडविले उत्कृष्ट कलेचे दर्शन

श्री चिंतामणी प्रतिष्ठान संचलित श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात संगीत विद्यालयातील शिष्यवृंदांच्या तबलापखवाजहार्मोनियमसोलो वादनासह गायनांचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच पखवाज व तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. संगीत विद्यालयाचे संचालक तथा पखवाज विशारद निलेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य परिवाराच्यावतीने येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

         यावेळी व्यासपिठावर आंतराष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकरमंजुषा दाभोलकरतबला शिक्षक प्रमोद मुंडयेपखवाज शिक्षक मोहन मेस्त्रीमहेश बोवलेकरहार्मोनियम वादक गजानन मेस्त्रीगायक वैभव परब बुवाशिवप्रसाद घारेश्री.बांदवलकर गुरुजीसुनिल नाईक आदी उपस्थित होते.

        प्रसिद्ध तबला वादक बंड्या धारगळकरनाट्य दिग्दर्शक दादा हळदणकरनार्वेकरदशावतार कलाकार पप्पू नांदोस्करनिवेदक काका सावंतशुभम धुरीबाबुराव खवणेकर तसेच विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी मनिष तांबोस्करगोल्ड मेडल विजेता तेजस मेस्त्रीभाविका खानोलकर यांचाही सत्कार करण्यात आला. तर लोकमान्य को.ऑफ.मल्टीपर्पज बँकेच्या माध्यमातून निलेश पेडणेकर यांना सन्मानित करण्यात आले.       

         या कार्यक्रमात एकूण ८४ विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तर यामेश खवणेकर याने सादर केलेल्या बासरी वादनाला प्रसन्न गावडे आणि भूषण सावंत यांनी उत्तम पखवाज व तबला साथ देत कार्यक्रमात रंगत आणली. हा कार्यक्रम विनाखंड १३ तास सुरु होता.

        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण कांदळकरसर्वेश तांडेलहरेश पडवळभाई वेंगुर्लेकरमहेश मुणनकरसागर सावळप्रतिक शेटकरसचिन नाईकगणेश आरावंदेकरसुयोग कासकरकाका पालकरपांडुरंग माडयेमंदार आरावंदेकरवेदांग बोवलेकरराजाराम पिंगुळकरनितीन परबकरण परब आदींनी विशेष मेहनत घेतली.

         कार्यक्रमाची सांगता सत्यनारायण कळंगुटकरतेजस मेस्त्री आणि पुरुषोत्तम परब यांनी सादर केलेल्या अभंगगौळण आणि भैरवीने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत आणि शुभम धुरी यांनी केले.

Leave a Reply

Close Menu