प्रिं.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने पालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सिद्धीविनायक कार्यालय येथे पालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांनी गायन, नृत्य, नाटीका व कवितेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
उद्घाटन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.देविदास आरोलकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक मिताली होडावडेकर व पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक कु.केतकी चेंदवणकर, सूत्रसंचालन कु.स्वरुपा आईर यांनी तर आभार कु.चिन्मय पेडणेकर हिने मानले. तर पालकांच्यावतीने निलेश चेंदवणकर यांनी शाळेच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. तसेच पालकांना व्यासपिठ दिल्याबद्दल शाळेचे आभार मानले.