वेंगुर्ला नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष, सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष, जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे संस्थापक, संचालक तसेच माजी अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते, गौड सारस्वत समाज, हिदी प्रचार सभा वेंगुर्ला, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ व्यापारी, शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रातील जाणकार अनिल श्रीकृष्ण सौदागर यांचा ७०वा वाढदिवस १८ ऑगस्ट रोजी साई डिलक्स हॉल येथे उत्साहात आणि व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी प्रसाद पारकर, चार्टर्ड अकाऊंटंट गजानन प्रभू, जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार यांच्यासह अन्य उपस्थितीत होते.