अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी केला नारळ अर्पण

वेंगुर्ला बंदर येथे पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील पोलिस ठाणे, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी तसेच जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला प्रांताधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसीलदार अभिजात हजारे, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu