दीड लाखांचे क्रीडा साहित्य प्राप्त

महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक क्रिडांगण विकास अनुदान योजनेतून सर्व क्रीडा प्रकारांत आवश्यक असणारे सुमारे दीड लाख रूपयांचे क्रीडा साहित्य वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. पुणे येथील सुमित स्पोर्ट प्रा.लि.कंपनीने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात वापरता येणारे सर्व प्रकारचे साहित्य दिले असून सिजन क्रिकेटचे किट, व्हॉलीबॉलचे खांबा साहित्य व अन्य सर्व क्रीडा प्रकारातील दर्जेदार साहित्याचा समावेश आहे.

      सध्या पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू असून योग्यवेळी राज्य शासनाच्या, क्रीडांगण विकास निधी अनुदानातून शाळेला क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्याबद्दल पालकमंत्री रविद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांनी आभार मानून या क्रीडा साहित्यांमुळे विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना अधिक वाव मिळेल असा विश्वासही व्यक्त केला.

 

Leave a Reply

Close Menu