भारतीय महिला फुटबॉल संघाच्या 2023 च्या फिजिओथेरेपिस्ट डॉ. साध्वी कोयंडे यांच्या फिजिओ-प्रो (स्पोर्ट) चे क्लिनिक कदंबा प्लॅटो, ओल्ड गोवा येथे भारतीय संघाचे माजी फुटबॉलपटू व कप्तान, गोवा फुटबॉलचे प्रेरक, अर्जुन व पद्मश्री अवार्ड सन्मानित श्री. बह्मानंद शंखवाळकर यांच्या हस्ते 18 मे रोजी संपन्न झाले.
डॉ. साध्वी हिने क्लिनिकमधील वापरण्यात येणारी अत्याधुनिक उपकरणे व त्यांचा खेळाडूंना तंदुरुस्त रहाण्यासाठी होणारा फायदा याविषयी माहिती दिली. तिचे शालेय शिक्षण गोव्यामध्ये झाले. तिने फिजिओथेरपीचे पदवी व मास्टर्स (स्पोर्ट)चे शिक्षण केएलई बेळगाव येथे पूर्ण केले. यापूर्वी तिने गोव्यातील मानांकित डेम्पो स्पोर्टस, सेझा फुटबॉल ॲकॅडमी, ज्युनियर भारतीय महिला (2017), खेलो इंडिया गोवा राज्य ॲथलेटीक संघ (2022), भारतीय महिला फुटबॉल संघ कॉलिफायर (किरगिझ व उझबेकिस्तान) व एशियन गेम्स (2023) चीन साठी फिजिओचे काम केले आहे.
श्री. शंखवाळकर यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये गोवा संघासाठी संतोष ट्रॉफी जिंकून देण्याचे महान कार्य केले आहे. 1985-1995 या दशकात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. फुटबॉलपटू म्हणून गोव्याचे ते पहिले अर्जुन ॲवॉर्ड विजेते आहेत.
डॉ. साध्वी यांच्या नूतन फिजिओ प्रो या क्लिनिकमध्ये स्पोर्टस इंजुरी संबंधित सर्व प्रकारच्या विशेष सुविधा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त तिला संगित व नृत्य क्षेत्रात पण विशेष रूची आहे. प्रमुख पाहुणे श्री. शंखवाळकर यांनी क्लिनिकमध्ये मिळणाऱ्या आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानाचा फायदा सर्व खेळाडूंनी व जनतेने घ्यावा असे सांगितले.