कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी तालुक्यातील पदवीधर मतदारांचा आढावा घेतला आणि गावनिहाय पहिल्या टप्प्यातील निवडणूक यंत्रणेची माहिती दिली. तर प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मतदारांपर्यंत चार टप्प्यात संफ करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी अॅड. सुषमा खानोलकर, सुहास गवंडळकर, राजन गिरप, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, वसंत तांडेल, दादा केळुसकर, ज्ञानेश्वर केळजी, सुजाता पडवळ, विष्णू परब, प्रकाश रेगे, प्रसाद पाटकर, प्रणव वायंगणकर, समिर नाईक, हेमंत गावडे, नारायण कुंभार, प्रशांत बोवलेकर, बंटी गावडे, मनोज उगवेकर, विजय बागकर, गणेश गावडे, सुनिल चव्हाण, समिर कुडाळकर, नितीन चव्हाण, राजबा सावंत, प्राजक्ता पाटकर, भूषण सारंग, रफिक शेख, प्रशांत आपटे, बाळू वस्त, प्रमोद वेर्णेकर आदी उपस्थित होते.