वेंगुर्ला भाजपाच्यावतीने दरवर्षी दहावी परीक्षेत तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकांत येणाया विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो. यावर्षी तालुक्यात प्रथम आलेली अर्पिता सामंत व द्वितीय आलेली गायत्री बागलकर यांचा परूळे विभागातील भाजपा पदाधिकायांनी तर तालुक्यात तृतीय आलेली प्रतिक्षा आरोलकर, सहावी आलेली दुर्वा परब, दहावी आलेली श्रृती शेवडे या विद्यार्थिनींचा वेंगुर्ला भाजपातर्फे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळु देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, लक्ष्मीकांत कर्पे, विष्णू परब, मनोहर तांडेल, भूषण सारंग, मारूती दोडाणशट्टी, संभाजी सावंत, अशोक आरोलकर, संतोष सावंत, संदिप परब आदी उपस्थित होते. लवकरच भाजपाच्यातीने तालुक्यातील दहावी, बारावीच्या प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच १०० टक्के निकाल देणाया हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती बाळू देसाई यांनी दिली.