शारदीय प्रतिष्ठानतर्फे पहिला पुरस्कार वितरीत

  खारेपाटण हायस्कूलचे माजी प्राचार्य शरद काळे यांच्या २६ मे २०२४ या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शिक्षण साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी शारदीय प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. शरद काळे यांच्या पत्नी वर्षा काळे, कन्या चारूता काळे-प्रभूदेसाई, डॉ.अनुजा जोशी आणि कपिल काळे यांनी या शारदीय प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर संवाद परिवारातर्फे शारदीय स्मृतिजागर कार्यक्रम घेण्यात आला. शरद काळे यांनी खारेपाटण हायस्कूलसाठी ध्येयनिष्ठ सेवा केली. ते कथाकार, कवी, ललित लेखक म्हणून प्रसिद्ध होते. कोमसापमध्येही ते सक्रीय होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी शिक्षण, साहित्य व संस्कृती या क्षेत्रात काम करणा­या दाम्पत्याला शारदीय प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, पहिला शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार माणगांव येथील डॉ.गौरी व गुरूनाथ गणपत्ये या आयुर्वेद व दिव्यांग सेवा करणा-या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. रोख ५ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

                                    

 

Leave a Reply

Close Menu