ऑनलाईन आर्थिक फसवणुकीस बळी पडू नका!-अग्रवाल

सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रॉड, एटीएम फ्रॉड, ओटीपी शेअरिग फ्रॉड, फिशिग कॉल, लिक, सोशल मिडियावर बनावट खाते निर्माण करून पैशांची मागणी करणे, ऑनलाईन जॉब देतो असे सांगून केलेले फ्रॉड, विवाहविषयक बनावटसंकेतस्थळ निर्माण करून केली जाणारी फसवणूक, ऑनलाईन कर्ज अॅप संबंधित फसवणूक, वीज बिल फसवणूक, लैंगिक शोषण फेसबुक, व्हॉट्सअॅप किवा इतर सोशल मिडियाद्वारे व्हिडिओ कॉल करणे आणि पैसे मागणे, क्युआर कोड स्कॅनर पाठवून केली जाणारी फसवणूक, स्क्रिन शेअरिग अॅड डाऊनलोड करण्यास सांगून केली जाणारी फसवणूक असा वेगवेगळ्या फसवणुकीच्या माध्यमाद्वारे होणा­या फसवणूकीस नागरिक बळी पडत आहेत. अशा सायबर गुन्ह्यांबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.  तसेच ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे मिळविण्याच्या आमिषाला बळी पडू नये असेही त्यांनी सूचित केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Close Menu