‘मैत्री-८९‘च्या स्नेहमेळाव्यात उल्लेखनीय कार्य करणा­-यांचा सन्मान

मैत्री ८९या पाटकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग ७ वर्षे एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन करीत आनंद लुटला. हा कार्यक्रम १ जून रोजी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला.

      या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून वेंगुर्ला येथे रूग्णसेवा करणारे प्रसिद्ध डॉ.राधाकृष्ण मांजरेकर, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद मणचेकर, मठ येथील प्रसिद्ध डॉ. सुदिश सावंत यांचा तसेच अलिकडेच मांडवी खाडीत बुडालेल्या दोन शाळकरी मुलांपैकी तळवडेतील गौरव देवेंद्र राऊळ या पंधरा वर्षिय मुलाचे प्राण वाचविणारे स्थानिक मच्छिमार दाजी बटवलकर, रूग्णवाहिकेची सेवा देणारे उभादांडा येथील बाबलो मांजरेकर, युवा रक्तदाते डिक्सन ब्रिटो यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वेंगुर्ल्यासहीत मुंबई, पुणे, गोवा, बेळगांव येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते. 

      वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील १९८९ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी मैत्री ८९या शिर्षकाखाली माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनविला असून या ग्रुपतर्फे स्नेहसंमेलनाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत.

Leave a Reply

Close Menu