शून्य जीवित हानीचे उद्दिष्ट

पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी एक बैठक घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः शून्य जीवित हानी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत कम्युनिकेशन आणि हेल्थ प्लॅन आपत्ती व्यवस्थापनाकडून तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील संभाव्य ६२ गावे दरड प्रवणग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या नैसर्गिक आपत्तींचे निवारण करण्यासाठी लाईफ जॅकेट्स, बोट्स, टेंड, कटर आदी विविध साधनसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे.

      कम्युनिकेशन प्लॅनमध्ये तलाठी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, वीज महावितरणचे कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी यांचा समावेश करून या सर्वांचे मोबाईल नंबर घेण्यात आले आहेत. गावात कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास ग्रामस्तरावरील कर्मचा­यांनी एकमेकांशी तातडीने समन्वय साधून व जिल्हास्तरापर्यंत त्याची माहिती देऊन युद्धपातळीवर मदत करायची आहे. तर हेल्थ प्लॅनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व अन्य आरोग्य कर्मचारी, रूग्णवाहिका चालकांचे मोबाईल व फोन नंबर एकत्रित केले आहेत. कुठल्याही प्रकारच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास हेल्थ प्लॅनच्या माध्यमातून समन्वय साधून तातडीने मदत केली जाणार आहे.

Leave a Reply

Close Menu