मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मधील सन १९९० मधील दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ३४ वर्षानंतर एकत्र येत स्नेहसंमेलन साजरे करत शालेय आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेले वर्षभर मेहनत घेण्यात आली होती.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक रा.पां.जोशी, मुख्याध्यापक सुनिल जाधव, श्री.मठकर, माजी कर्मचारी बाबी होडावडेकर यांची खास उपस्थिती होती. तर माजी विद्यार्थ्यांमधून रश्मी वजराटकर, नित्यानंद शेणई, चारूदत्त जोशी, सीमा कावले, शैलजा मठकर, भगवान गावडे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. उमेश आईर यांनी सर्वांना शाल व श्रीफळ भेट दिली. तर भाऊ उर्फ भगवान बोवलेकर यांनी आपले मौलिक अनुभव मांडले. यावेळी गीता होडावडेकर, किशोर पोतदार, सचिन नाईक, संदिप शेंडगे, प्रकाश बोवलेकर, किशोर धुरी, संतोष परब, रूपाजी गावडे, संतोष धुरी, संध्या सामंत आणि सुलभा ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल बोवलेकर यांनी केले. स्नेहसंमेलनासाठीचा न्याहारी व भोजन खर्च रा.पां.जोशी यांनी केला.