लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचा सिहाचा वाटा असल्याबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व श्रीराम सीताचे शिल्प देऊन सत्कार करण्यात आला. राणेंच्या विजयानंतर पालकमंत्री चव्हाण हे प्रथमच ११ जून रोजी वेंगुर्ला दौयावर आले असता येथील साई डिलक्स हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, नारायण राणे यांच्या विजयासाठी वेंगुर्ला तालुक्याने साडेनऊ हजार मताधिक्य दिल्याबद्दल तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कामाबाबत पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.