वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरांची यशस्वी वाटचाल करताना विविध सहयोगी संस्था आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा यांच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे आयोजित केलेल्या २५ व्या महारक्तदान शिबिरात १०६ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक दादासाहेब परूळकर, उद्योजक सुधीर झांट्ये, सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, जैतिराश्रीत संस्थेचे अध्यक्ष अॅड.प्रभानंद सावंत, उपाध्यक्ष विष्णू परब, लोकमान्य बँकेचे चक्रपाणी गवंडी, वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, डॉ.पूजा कर्पे, प्रकाश परब, ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर, नारायण कुंभार, चरित्रा परब, रतन कबरे, विनिता शेटकर, आनंद तांडेल, सुजाता पडवळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.डॉ.सचिन परूळकर, रक्तपेढी गोवा मेडिकल कॉलेजचे वैदयकीय अधिकारी डॉ. संजय कोरगांवकर, मंगेश राऊळ, मिलिंद शेटकर, संजय परब, संदीप पेडणेकर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या रक्तदान क्षेत्रातील वाटचालीत आतापर्यंत रक्तदान शिबिरात नियमित रक्तदान करणाया व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन नेहमीच रक्तदान करणाया सुमारे ३०० पेक्षा जास्त रक्तदात्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित करणाया रोझारिओ मित्रमंडळ उभादांडा, जबरदस्त मित्रमंडळ राऊळवाडा, रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा, आयुष चॅलेंजर्स मित्रमंडळ परबवाडा, शिवप्रेमी यशवंतगड रेडी, युनिक ब्लड मोटिवेटर्स, महापुरूष युवा मित्रमंडळ शिरोडा, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला या संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला. वेताळ प्रतिष्ठान रक्ताचे नाते जपत आहात, त्यासाठी आवश्यक सहकार्य जिल्हा बँकेच्यावतीने सदैव केले जाईल असे प्रतिपादन मनिष दळवी यांनी केले. प्रतिष्ठानच्या रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजूंना मोलाची मदत होत असल्याबद्दल नितीन मांजरेकर यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. या रक्तदान शिबिरासाठी ग्रामपंचायत तुळस, लोकमान्य कॉ.ऑपरेटिव्ह बँक शाखा वेंगुर्ल, श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, गुरूकुल शिक्षण संस्था न्हावेली, श्री चिंतामणी प्रतिष्ठान वेंगुर्ल, सातेरी महिला मंडळ तुळस, कुंभारटेंब युवक कला क्रीडा मंडळ, देसी बॉयज क्रिकेट संघ होडावडा, झेंडोबा कला क्रीडा मंडळ-पाल, लोकनेता अॅड.दत्ता पाटील मेडिकल कॉलेजचा एनएसएस विभाग आदींनी सहयोग संस्था म्हणून सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश राऊळ, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, नाना राऊळ, रोहन राऊळ, किरण राऊळ, किशोर राऊळ, सचिन राऊळ, प्रविण राऊळ, प्रसाद भणगे, राजेश परूळकर, प्रदीप परूळकर, सागर सावंत, प्रिती परूळकर, प्रतिक परूळकर,प्रज्वल परूळकर, दीपक नाईक, यशवंत राऊळ, सचिन गावडे, संदीप तुळसकर, राजेश चौगुले, जान्हवी सावंत, वैष्णवी परूळकर, भक्ती भणगे, हेमलता राऊळ, प्रांजली सावंत, कुंदा सावंत, निकिता कबरे, गणेश सावंत, विधी नाईक, प्रमोद तांबोसकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.