विजेचा लोळ पडून हजारोंचे नुकसान

नवाबाग येथे ६ जून रोजी दुपारी ढगांच्या गडगडासह विजेचा लोळ पडला. यात ग्रा.पं.माजी सदस्य बळीराम कुबल यांच्या घरातील वीजमीटर, तीन लाईटचे बोर्ड, मेनस्वीच, पंखा, टीव्हीचा सेटअप बॉक्स, टीव्ही, घरातील दोन खोल्यांचे वायरिग व फिटींग व अर्ध्या हॉर्सपॉवरचा पाण्याचा पंप जळून सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले. उत्तम आरावंदेकर यांच्या घरातील टीव्हीचा सेटअप बॉक्स व चैताली उत्तम आरावंदेकर हिचा महागडा मबाईल जळून नुकसान झाले. दशरथ तांडेल यांच्या घरातील दोन फॅन व विजय लुमाजी यांच्या घरातील मेनस्वीच जळून नुकसान झाले. हरी कुबल यांच्या घरातील टीव्हीचा सेटअप बॉक्स, घरातील लाईटचे दिवे, बोर्ड, मोबाईल चार्जर तसेच सुहास खडपकर यांच्या घरातील लॅपटॉप जळून नुकसान झाले. सरपंच निलेश चमणकर, तलाठी रामोड, ग्रामसेवक काळसेकर यांनी पंचनामा केला.

Leave a Reply

Close Menu