तालुका स्कूलमध्ये बांधकाम कामाचा शुभारंभ

वेंगुर्ला शहरातील सर्वात जुन्या १५० वर्षे पूर्ण झालेल्या वेंगुर्ला तालुका स्कूल नं.१ च्या दुस­-या मजल्यावर दन वर्गखोल्या व हॉल निर्मितीच्या कामास सुरूवात झाली असून याचा शुभारंभ मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांच्या हस्ते झाला.

      शाळेचे माजी विद्यार्थी शांताराम वासुदेव नाईक व कुटुंबियांकडून शाळेच्या दुस-या मजल्यावरील जागेत दोन वर्गखोल्या व विविध कार्यक्रमांसाठी हॉलच्या कामासाठी १० लाख निधी देण्याचे स्पष्ट केले. पण ही देणगी प्रत्यक्ष न देता बांधकामासाठी होणारा खर्च ते स्वतःच करणार आहेत. शुभारंभप्रसंगी  देणगीदार शांताराम नाईकशालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकरउपाध्यक्ष सोनल राऊळमाजी अध्यक्ष राजन केरकरसदस्य संजय पिळणकरबाळा कोरगांवकरशिक्षिका गायत्री बागायतकरकर्मचारी योगिता मिशाळठेकेदार अखिल आरोसकरमहादेव गावडेशुभ्रा राऊळश्वेता आरोसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu