व्यस्त जीवनशैलमधून योगासाठी वेळ द्या-परितोष कंकाळ

रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली म्हण्णून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळावे यासाठी सर्वांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून किमान एक तास योगासाठी द्यावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी योग दिन कार्यक्रमाप्रसंगी केले.

      वेंगुर्ला नगरपरिषदसिधुदुर्ग योग प्रसार संस्था-सिधुदुर्ग व डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळलीना यरनाळकरडॉ.वसुधा मोरेप्रशासकीय अधिकारी संगिता कुबल व शिक्षक रामा पोळजी यांच्या हस्ते झाले. डॉ. वसुधा मोरे यांनी उपस्थितांकडून वेगवेगळी योगासाने करवून घेतली आणि मार्गदर्शनही केले.  

      योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणेआपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणेयोगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणेमानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणेयोगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे हा उद्देश योगदिवस साजरा करण्यामागे होता.

Leave a Reply

Close Menu