किरण ठाकूर यांची सिंधुदुर्ग महाविद्यालयास सदिच्छा भेट

समूहाचे संस्थापक आणि सल्लागार किरण ठाकूर यांनी २१ जून रोजी मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी त्यांचे स्वागत गेले. या भेटीमध्ये त्यांनी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग तसेच एनसीसी कॅडेट्स यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविद्यालयात विविध कौशल्य व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या शिक्षणविश्वामध्ये विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवनवीन व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम चालू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष अॅड. समीर गव्हाणकर यांसह कनिष्ठ व वरिष्ठ विभागांचा सर्व प्राध्यापक वर्ग, तसेच प्रशासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Close Menu