पदवीधर मतदारसंघासाठी वेंगुर्ला तालुक्यात ७८ टक्के मतदान
पदवीधर मतदारसंघासाठी वेंगुर्ला तालुक्यात ७८ टक्के मतदान
June 27, 2024
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज वेंगुर्ला तालुक्यातून ७८ टक्के मतदान झाल्याची माहिती वेंगुर्ला निवडणुक कार्यालयातून देण्यात आली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतर्फे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे तर इंडिया आघाडीतर्फे राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश कीर हे निवडणुक रिगणात आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील तीन मतदान केंद्रांवर पदवीधर मतदारांनी मतदान केले. यात मतदान केंद्र क्रमांक ११७वर ३७१ पैकी ३०२ पुरूष तर २७१ पैकी २०३ स्त्रीयांनी मतदान केले. ११७ अ केंद्रावर ४६९ पैकी ३६६ पुरूष तर २८७ पैकी २१७ स्त्रीयांनी मतदान केले. ११८ नंबरच्या मतदान केंद्रावर १३१ पैकी १०० पुरूष तर १३० पैकी १०६ स्त्रीयांनी मतदान केले. तालुक्यात एकूण १६५९ पैकी १२९४ एवढ्या पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.