प्रदेश महिला उपाध्यक्षपदी नम्रता कुबल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी वेंगुर्ल्याच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फैजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांनी नम्रता कुबल यांना प्रदान केले. यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब, सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Close Menu