राज्य परिवहन महामंडळा मार्फत हिदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल एसटी महामंडळाचे जनसंफ अधिकारी अभिजीत भोसले यनी जाहीर केला आहे. यात मुंबई प्रदेश झोन विभागातून वेंगुर्ला बसस्थानकाने ७२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी वेंगुर्ला आगार ५ लाख रूपयांच्या बक्षिसास पात्र ठरले आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ३१ जिल्ह्यांतील राज्य परिवहन महामंडळाची आगारे व बसस्थानके यांची नियमित तपासणी व्हावी, प्रवाशांना सेवा व सुविधा मिळतात की नाही, याबरोबर आगार व बसस्थानकांत गाड्यांसह परिसराची स्वच्छता असते की नाही, याची दरवर्षी पाहणी व्हावी व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळामार्फत ‘हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान‘ स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येत आहे. यावर्षी या स्पर्धेत सहभागी असलेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यातील १८ बसस्थानकांची तपासणी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी विभागाच्या समितीतर्फे झाली होती. या समितीत विभाग नियंत्रक, विभागीय अभियंता, विभागीय उपअभियंता, विभागीय कामगार अधिकारी, सांख्यिकी अधिकारी व स्थानिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर, पत्रकार भरत सातोसकर, प्रवासीमित्र वैभव खानोलकर आदी सदस्यांचा सहभाग होता.
या स्पर्धेच्या निमित्ताने वर्षभरात वेंगुर्ला व शिरोडा स्थानकातील परिसर, बसेस, वेंगुर्ला आगार परिसर, बसस्थानक स्वच्छतेबरोबरच पर्यावरणपूरक वसुंधरेबाबत केलेले काम, प्रवाशांसाठी केलेल्या सेवासुविधा तसेच अन्य बाबी यांची पाहणी या समितीने विविध जागांवर जाऊन केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रवासी व नागरिकांकडून वेंगुर्ला आगाराचे अभिनंदन करण्यात येत आहे.