हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेत मुंबई प्रदेश झोन विभागातून वेंगुर्ला बसस्थानकाने ७२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल भाजपा व सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भाजपा व सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्यावतीने आगार व्यवस्थापक राहूल कुंभारे व टी.आय.विशाल देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, वसंत तांडेल, दादा केळुसकर, पपू परब, प्रशांत आपटे, वृंदा गवंडळकर, पुंडलिक हळदणकर, दाजी तळवणेकर, भरत चव्हाण, भाऊ सावळ, मनोज दाभोलकर, विनायक दाभोलकर, निखिल भाटकर, लक्ष्मण कोळेकर, चालक साहिल प्रभू, आशिष खोबरेकर, उमेश राऊळ, योगेश खानोलकर, प्रकाश कराड, महादेव भगत, कर्मचारी अर्चना कांबळी, धनश्री तांडेल, शितल ठाकूर, कल्पिता तांडेल, योगेश्री वाडकर, मॅकेनिकल गौरव रेडकर, परेश धर्णे, भरत सुकळवाडकर, शशिकांत कशाळकर, साई तुळसकर, विलास केसरकर, व्ही.व्ही.रेवंडकर, अमित कुडतरकर, अरूण मेस्त्री यांच्यासह चालक, वाहक उपस्थित होते.