सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १०८ रूग्णवाहिका सेवेने दशकसेवेचा टप्पा पूर्ण केला असून राज्यात आतापर्यंत एक कोटीपेक्षाअधिक रूग्णांना ही सेवा दिली आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ४२३ रूग्णांना या सेवेचा लाभ मिळाला असून तब्बल ५० टक्के रूग्णांचे प्राण वाचविण्यास ही रूग्णसेवा यशस्वी ठरली आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी कार्यान्वित झालेल्या या वैद्यकीय सेवेने दशकसेवेचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्या सिधुदुर्गात बेसिक सुविधेच्या ९ अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या तीन अशा एकूण १२ रूग्णवाहिका कार्यरत आहेत. यामधून २५ डॉक्टर्स आणि २९ पायलट सेवा देत आहेत. अतिजलद व तत्पर सेवेमुळे ५० टक्के गंभीर रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. तर २४२ महिलांची प्रसुती या रूग्णवाहिकेतच झाली आहे. १०८ रूग्णवाहिका वेळेत पोहोचली म्हणूनच आमचे प्राण वाचले, असे म्हणणाया अनेक रूग्णांचे आशीर्वाद या रूग्णसेवेला लाभलेत. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हस अंतर्गत हे काम सुरू आहे. एमईएमएसचे ज्ञानेश्वर शेळके हे सीईओ, तर हनुमंतराव गायकवाड हे एमडी म्हणून काम पाहत आहेत.