परूळेबाजार ग्रामपंचायतीचा सन्मान

परूळेबाजार ग्रामपंचायतीला जाहीर झालेल्या कै.वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार १ जुलै रोजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्यामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी परूळेबाजारचे प्रभारी सरपंच राजू दूधवडकर व माजी सरपंच प्रदिप प्रभू यांचा सन्मान केला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांच्यासह वसंत तांडेल, गणपत माधव, शरद मेस्त्री, सुधीर ठाकूर, सीमा सावंत, सुधीर पेडणेकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu