परूळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थीनी अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.दहावी) मार्च २०२४ उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. या पुनर्मुल्यांकनानंतर तीन गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० (१०० टक्के) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे १०० टक्के गुण झाल्याने ती जिल्ह्यात व राज्यात प्रथम आली आहे. पुनर्मुल्यांकनापूर्वी तिला ५०० पैकी ४९७ गुण मिळाले होते. पुनर्मुल्यांकनानंतर तिला मराठी विषयात दन गुण व समाजशास्त्र विषयात एक गुण असे एकूण तीन गुण वाढल्याने तिने आता पाचशेपैकी पाचशे गुण म्हणजेच शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ.उमाकांत सामंत, ‘सीईओ‘ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, पालक व ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.