डॉक्टर हा देवमाणूस आहे. समाजाभिमुख कार्य करणारी वेताळ प्रतिष्ठान मंडळ हे समाजाचा आरसा आहे. यापुढे अशा उपक्रमांना आपले सहकार्य राहणार असल्याचे सांगत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी या मतदार संघात सहा रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, कुंभारटेंब युवक कला-क्रीडा मंडळ तुळस आणि विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्ग आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा सुमारे २२८ लोकांनी लाभ घेत समाधान व्यक्त केले. उद्घाटन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रश्मी परब, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, विश्व हिंदू परिषदचे डॉ.राजन शिरसाट आणि नंदू आरोलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद तांडेल, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर व नारायण कोचरेकर, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते.
या शिबिरात मुंबई येथील प्रतिथयश डॉ.दिलीप पवार, डॉ.रोहन कुलूर, डॉ.शामला कुलूर, डॉ.किशोर धोंड, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.गणेश मुंडे, डॉ.शाम राणे, डॉ.समृध्दी राणे, आयुर्वेदाचार्य डॉ.माधुरी शिरसाठ यांनी सेवा दिली. सर्व डॉक्टरांचा भेटवस्तू, शाल, रोप देऊन विशाल परब यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शिबिरात स्त्री रोग, गर्भाचे आजार, हृदय विकार, नाक, कान, घसा, हात-पाय-सांधेदुखी, हाडाचे व दातांचे आजार, कॅन्सर, मेंदू विकार आणि आयुर्वेद अशा बाबींवर रोग निदान करून सर्वांना मोफत औषधे देण्यात आली.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. तर अॅड.दत्ता पाटील हॉमियोपॅथी मेडिकल कॉलजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार विजय रेडकर यांनी मानले. या शिबिराला पेंडूर सरपंच संतोष गावडे, रवी शिरसाट, सुहास गंवडळकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, परबवाडा उपसरपंच पपू परब, विश्व हिंदू परिषदचे सावंत आणि आपा धोंड, प्रणव वायंगणकर आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.